महाराष्ट्र

Solapur Maratha Cmmunity : माढ्यातील सकल मराठा समाज आक्रमक! अजित पवारांना बंदी, तर शरद पवारांचं स्वागत

नवशक्ती Web Desk

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमीकेमुळे अनेक मराठी आमदार खासदारांना मतदार संघात अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता याची झळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बसणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करणाऱ्यांचा अजित पवारांवर रोष आहे. पिंपळनेर कारखाना कार्यक्रमासाठी अजित पवार यांना येण्यास आंदोलकांनी बंदी केली आहे. सकल मराठा समाजाने अजित पवराच्या प्रवेशबंदीची घोषणा केली आहे.

२३ ऑक्टोबर रोजी अजित पवार हे सोलापूरमधील माढा इथे बबनदादा शिंदे यांच्या पिंपळनेर साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी येणार आहेत. मात्र, सकल मराठा समाजाने त्यांना येऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाकडून माढा पोलिसांना त्याबाबतचा अर्ज देण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे शरद पवार त्याच दिवशी माढ्यातील कापसेवाडीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी येत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २००९ साली सोकसभेसाठी बारामती सोडून माढा मतदार संघाला पसंती दिली होती. आणि त्या ठिकाणाहून निवडून देखील आले होते. सद्यस्थितीत शरद पवारांचे एकेकाळचे विश्वासू समजले जाणारे रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबत आहेत. मधल्या काळात ते राष्ट्रवादी सोडून भाजपात जाणार अशी चर्चा होती. सोलापूरवर एकेकाळी या जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असणारे विजयसिंह मोहिते पाटील हे आता भाजपसोबत आहेत. २०१४ ला मोदी लाट असताना देखील विजयसिंह मोहिते पाटील या मतदार संघात निवडून आलेले खासदार होते. यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे ते भाजपात गेले.

सद्याच्या स्थितीत सोलापूर आणि साताऱ्यात राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अनेक नेते हे अजित पवार गटात गेले आहेत. तर काही जाण्याच्या तयारीत आहेत.असं असलं तरी देखील राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं तेव्हा शरद पवार यांच्याडे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं. त्यामुळे माढ्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील माहिती पवारांना आहे.

दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्या चांगलाच गाजत आहे. असं असताना सकल मराठा समाजाकडून आजी-माजी आमदार खासदारांना गावात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींची अधिक कोंडी झाली आहे. मराठा आरक्षणाची झळ आता लोकप्रतिनिधींना देखील बसू लागली असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे आता अनेक गावांत राजकीय कार्यक्रम बंद आहेत.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत