महाराष्ट्र

"पिकं तुडवू नका रे..." कृषीमंत्री धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

नवशक्ती Web Desk

मागच्या वर्षी गोगल गायींनी मोठ्या प्रमाणावर पिकांची नसाडी केल्याचे प्रकरणं समोर आली होती. यंदा देखील परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसंच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यात मुख्यता सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज स्वत: थेट शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊ नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

यावेळी गोगलगायींना नष्ट करणारे मेटाडेल हे औषध बाजारात सहज उपलब्ध असून त्याची किंमतही जास्त नाही. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून कृषी विभागासाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या निधीमधून या औषधाची खरेदी करता येईल का? याबाबत चाचपणी करून तातडीने निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असल्याने उशिराने पेरण्या झाल्या. अनेक पिकांची वाढ खुंटली आहे. अशात धनंजय मुंडे यांच्यासह अधिकारी पिकांची पाहणी करायला आले असता "पिकं तुडवू नका रे... आधीच थोडं उगवलं आहे, आपल्या पायांनी आणखी त्यांचे नुकसान करू नका!" अशा सक्तीच्या सुनचा मुंडे उपस्थितांना दिल्या. बीडमध्ये पाऊस आणखी लांबल्यास दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे पाठीशी राहीलं, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना दिला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस