महाराष्ट्र

मोठी बातमी! अहमदनगरच्या आयुक्तांनी मागितली 8 लाखांची लाच; ACB च्या कारवाईची कुणकुण लागताच पंकज जावळे फरार

Suraj Sakunde

अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत विरोधी विभागानं मोठी कारवाई केली असून त्यांचं राहतं घर सील केलं आहे. बांधकाम परवानगी देण्यासाठी ८ लाखांची मागणी केल्याची आरोपावरून एसीबीनं त्यांच्यावर कारवाई केली आहे. लिपिक शेखर देशपांडे याच्यामार्फत लाच मागितल्याचं समोर आलं आहे. दरम्यान एसीबी पथक कारवाईबाबत समजताच डॉ. पंकज जावळे आणि लिपिक शेखर देशपांडे दोघेही फरार झाले आहेत.

बांधकाम परवान्यासाठी मागितले ८ लाख रुपये...

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, अहमदनगरमधील एका कन्ट्रक्शन फर्मला बांधकाम परवाना हवा होता. हा परवाना देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी लिपिक शेखर देशपांडे यांच्यामार्फत संबंधित फर्मकडे तब्बल ८ लाख रुपयांची लाच मागितली. १९ आणि २० जून रोजी लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी ही लाच स्वीकारण्यात येणार होती. महत्त्वाचं म्हणजे या दोघांनीही गुरुवारी रजा टाकल्याची माहिती समोर आली आहे.

आयुक्तांचं राहतं घर एसीबीनं केलं सील-

या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली गेल्यानंतर एसीबीनं तातडीनं कारवाईला सुरुवात केली. परंतु या कारवाईची कल्पना मिळताच हे दोघेही फरार झाले आहेत. यानंतर एसीबीनं लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाणनगरमधील घरावर छापा टाकला, तर आयुक्त जावळेंचं राहतं घर लाचलुचपत विभागानं सील केलं आहे. गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून एसीबीनं ही कारवाई सुरु केली आहे. या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत