महाराष्ट्र

Ajit pawar : अजित पवारांच्या पारनेमधील भाषणाची सर्वत्र चर्चा ; म्हणाले,"आधुनिक श्रावण बाळ म्हणून..."

पारनेर मतदार संघातील विविध कामं करण्याचं आश्वासन देखील अजित पवारांकडून देण्यात आलं.

नवशक्ती Web Desk

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगरमधील पारनेर दौऱ्यावर आहेत. आमदार निलेश लंके यांच्या पारनेरचे मतदार संघात अजित पवार यांनी केलेलं धडाकेबाज भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या संपूर्ण भाषणात अजित पवार यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. तसंच आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर. आऱ आबा यांची ओळख होती. आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख असल्याचं ते म्हणाले. कोरोना काळात लंके यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करत पारनेर मतदार संघातील विविध कामं करण्याचं आश्वासन देखील अजित पवारांकडून देण्यात आलं.

यावेळी बोलताना अजित पवार यांच्याकडून 'वसा विकासाचा आणि बहुजनांचा' हे सुत्र राज्यातील जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही करतो असं म्हणाले. आमदार निलेश लंके यांच्या मतदार संघात निधी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सरकारकडून क्रीडा क्षेत्रासाठी मदत केली जाणार आहे. विविध पाणी उपसा सिंचन योजनेसाठी निधिची आवश्यकता आहे. तो निधी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. बीओटी तत्वावर बस स्थानक, बाजार समिती, क्रीडा संकुलासाठीच्या निधीसाठी आम्ही प्रयत्न करतणार आहोत. असा शब्दा त्यांनी दिला.

दरम्यान, अजित पवार हे पारनेच्या हंगा इंथ दाखल झाले आहेत. त्यांच्या हस्ते 'माता मोहटादेवी महिला देवर्शन यात्रे'चा शुभारंभ होणार आहे. आमदार निलेश लंके यांच्याकडून या यात्रेच आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवारांचं जेसीबीने पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आलं.

कायदेशीर प्रक्रियेत कोणालाही खोडा घालण्यास मुभा नाही - उच्च न्यायालय

यूपीआयची आज दशकपूर्ती; दहा वर्षांत व्यवहारात १३ हजार पटीने वाढ

भारतात साखरेची कमतरता नाही; 'इस्मा'चा ठाम दावा

भारत आणि रशिया व्यापार सहकार्य वाढणार; परराष्ट्र मंत्री जयशंकर-पुतीन भेट

रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल