रामबंधू जगताप
महाराष्ट्र

एआय तंत्रज्ञानाने आधुनिक शेती; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

कराड : कृत्रिम बुद्धीमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ५०० कोटीची तरतूद एआयकरिता केली आहे.

Swapnil S

कराड : कृत्रिम बुद्धीमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ५०० कोटीची तरतूद एआयकरिता केली आहे. शेतकऱ्यांनी कमी पाणी व उत्पादन खर्चात जास्तीत जास्त कृषी उत्पन्न मिळवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊस, कांदा, सोयाबीन, कापूस यासह फळबागांची आधूनिक शेती करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कोरेगाव तालुक्यातील पिपोंडे बु. येथील बाजार पटांगणात शनिवारी दुपारी मंत्री पवार यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन कांबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन खर्च कमी करता येतो, खात्रीशीर जास्त उत्पादन मिळवता येते, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आजच्या घडीला शेतीबाबतीत मोबाईलवर शेती पीक,पाणीवापर,अचूक खत व्यवस्थापन, जमिनीचा पोत, किड नियंत्रण, हवामान विषयक अचूक माहिती, पिकांसाठी शाश्वत बाजारपेठ आदी सर्व माहिती उपलब्ध होते. या तंत्रज्ञानाचा वापर केला तरच शेतीचे उत्पन्न वाढवता येईल. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञान आधारीत आधुनिक शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिथे जिथे शेतकऱ्यांना अडचण येईल तिथे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहील, शेतकऱ्यांच्या विकासासाठी निधीची अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळबागांना शाश्वत बाजार पेठ मिळवून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी वारंवार दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या तालुक्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी शासन सर्वोच प्राधान्य देत असल्याचे सांगून या करीता निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांचा दिमाखदार नागरी सत्कार करण्यात आला.

पाण्याचा प्रश्न चर्चेद्वारे सोडवला जाईल

उत्तर कोरेगावातील २६ गावात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी यावर काम सुरू केले आहे. सोळशी येथील प्रस्तावित धरण हे महाबळेश्वर तालुक्यात येत असून याच्या सर्वेक्षणाला आणि धरणाच्या कामासाठी प्राथमिक तरतूद केली आहे. येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेद्वारे यावर मार्ग काढला जाईल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.

गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिकचा कहर! तब्बल १२ तास अडकले हजारो लोकं, २० पेक्षा जास्त शाळांच्या पिकनिक रद्द