अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!" 
महाराष्ट्र

Ajit Pawar death : अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!"

विमान अपघात झाला तेव्हा अजित पवार यांची आई आशा पवार या बारामतीच्या फार्महाऊसवर टीव्ही पाहत होत्या. फार्महाऊसचे मॅनेजर संपत धायगुडे यांनी सांगितले की, आशाताईंनी मला विचारले की, दादांचा अपघात झाला का? मुलाच्या मृत्यूची बातमी तिला कळू नये म्हणून आम्ही बंगल्यातील टीव्हीचे केबल तत्काळ कापले. त्यांचा मोबाईल ‘फ्लाइट मोड’वर टाकला. काहीही झाले नाही, असे आम्ही त्यांना सांगितले.

Swapnil S

विमान अपघात झाला तेव्हा अजित पवार यांची आई आशा पवार या बारामतीच्या फार्महाऊसवर टीव्ही पाहत होत्या. फार्महाऊसचे मॅनेजर संपत धायगुडे यांनी सांगितले की, आशाताईंनी मला विचारले की, दादांचा अपघात झाला का? मुलाच्या मृत्यूची बातमी तिला कळू नये म्हणून आम्ही बंगल्यातील टीव्हीचे केबल तत्काळ कापले. त्यांचा मोबाईल ‘फ्लाइट मोड’वर टाकला. काहीही झाले नाही, असे आम्ही त्यांना सांगितले.

मॅनेजर संपत म्हणाले की, अजित पवार यांना किरकोळ जखम झाली असावी, असे आशाताई यांना वाटले. दादांना बारामती रुग्णालयात नेले जात असल्याची बातमी टीव्हीवर दाखवू लागले. तेव्हा आम्ही आशाताईंना सांगितले की, काहीही झालेले नाही. पण, त्या फार्महाऊसच्या बाहेर पडल्या आणि म्हणाल्या, मला दादांना भेटायचे आहे. त्या कोणचेही ऐकत नव्हत्या. आम्ही त्यांना बारामतीच्या बंगल्यापर्यंत घेऊन गेलो.

गेल्या शनिवारी अजितदादा आपल्या आईला भेटण्यासाठी फार्महाऊसवर आले होते. तिथे त्यांनी आपल्या आईसोबत पाऊणतास मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. आईची विचारपूस केल्यानंतर त्यांनी शेतातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

दुर्दैवी योगायोग

अजित पवारांचा अपघाती मृत्यू आणि ६ अंकाशी या घटनेचा असलेला संबंध हा दुर्दैवी योगायोग आहे, असे नेटकरी सोशल मीडियावर म्हणू लागलेत. पवार यांच्या निधनानंतर समोर आलेला एक दुर्दैवी योगायोग संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून टाकणारा आहे. ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस इतके आयुष्य लाभलेल्या या नेत्याने आपल्या कार्यकाळात तब्बल ६ वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. '६' या अंकाचा हा विचित्र योगायोग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ६ क्रमांक आणि अजित पवार यांच्यासोबतचा नियतीचा हा खेळ पाहून राज्यातील कार्यकर्ते भावूक झालेत.

सकाळी ११ वा. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग (प्रोटोकॉल) नुसार, गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. राज्यात तीन दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार यांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले होते. तिथे अभूतपूर्व गर्दी झाली होती. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. याठिकाणी त्यांचे पार्थिव रात्री १० वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. गुरुवारी सकाळी ६ ते ९ त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण करेल, तर सकाळी ११ च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील. अंत्यसंस्कारावेळी अजित पवारांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार मतदान

अजित दादा पंचतत्त्वात विलीन! शोकाकूल वातावरणात पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

"दादांना म्हणालो होतो रात्रीच कारने जाऊ, पण..."; अजित पवारांच्या चालकाला 'त्या' रात्रीची आठवण सांगताना अश्रू अनावर

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video

एका चुकीबद्दल अन्नपाण्याविना केला होता आत्मक्लेश; यशवंतरावांचे स्मृतिस्थळ होते अजितदादांचे शक्तिस्थळ!