महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात भक्कम स्थान करण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील

Swapnil S

रोहित चंदावरकर/पुणे

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे आणि ज्येष्ठ २८ वरिष्ठ नेत्यांनी व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्का आहे. त्यामुळे अजित पवार यांनी प. महाराष्ट्रात आपली पाळेमुळे भक्कम करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीत आपली व्होटबँक भक्कम करण्यासाठी अजित पवार यांनी प. महाराष्ट्रात दौरे सुरू केले आहेत. शेतकरी, महिला व तरुणांना आकर्षित करायला सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे महिलांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. तसेच दोन शेतकरी मेळावे घेतले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील हे पराभूत झाले होते. शरद पवार यांचे उमेदवार निलेश लंके हे विजयी झाले.

प. महाराष्ट्रात ५८ विधानसभा मतदारसंघ आहेत. हे सर्व मतदारसंघ पवार कुटुंबीयांचे बालेकिल्ले आहेत. आता अजित पवार व शरद पवार यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. प. महाराष्ट्रावर नियंत्रण ठेवण्यावरून काका व पुतण्यात लढा सुरू झाला आहे. प. महाराष्ट्रात १० लोकसभा मतदारसंघ असून त्यातील महायुतीने केवळ ४ जिंकल्या तर ६ महाविकास आघाडीने विजय मिळवला. त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे. आता प. महाराष्ट्रावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहे.

अहमदनगर हा दुष्काळी जिल्हा असून बेरोजगारीचा प्रश्नही आ वासून उभा आहे. आम्ही धर्म, जात न पाहता सर्व पात्र महिलांना सर्व सरकारी योजनांचा लाभ देणार आहोत. तसेच पात्र महिलांना वर्षातून तीन सिलिंडर मोफत देणार आहोत. शेतकऱ्यांना शेत पंपासाठी मोफत वीज देण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.

येत्या काही दिवसांत अजित पवार हे प. महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरे करणार आहेत. राज्यात महायुती सत्तेवर आल्यास केंद्र सरकारच्या सहाय्याने विविध विकासाच्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकेल, असे साकडे ते मतदारांना घालणार आहे.

व्यावसायिक निवडणूक व्यवस्थापन समितीची नियुक्ती

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नुकतीच व्यावसायिक निवडणूक व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मतदारांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मी आलो आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल महिलांना मदत म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यातून प्रत्येक महिलेला दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. महिलांच्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था