महाराष्ट्र

जपानी कंपन्यांना भेडसावणारे प्रश्न तातडीने सोडवणार

मुंबई, पुण्यासह राज्यात जपानी कंपन्या कार्यरत असून जपानी कंपन्यांना भेडसावणारे प्रश्न तातडीने सोडवण्यास राज्य शासन प्राधान्य देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली.

Swapnil S

मुंबई : मुंबई, पुण्यासह राज्यात जपानी कंपन्या कार्यरत असून जपानी कंपन्यांना भेडसावणारे प्रश्न तातडीने सोडवण्यास राज्य शासन प्राधान्य देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर अजित पवार बोलत होते. दरम्यान, सणसवाडी ते पिंपळे जगताप रस्त्यासाठी ८० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. रस्ते प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिक दृष्ट्याही दोन्ही देशांचे वेगळे नाते आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. भारतात जपानने मोठी औद्योगिक गुंतवणूक केली असून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर, पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत, रोजगार निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करा, असे पवार म्हणाले.

पॅराग्वे - भारत दरम्यान करार

मुंबई : पॅराग्वेच्या उद्योग मंत्रालय आणि उद्योग व वाणिज्य मंडळ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. हा करार व्यक्ती आणि संस्था यांच्यामध्ये एक सेतू म्हणून कार्य करेल, असा विश्वास पॅराग्वे अध्यक्ष सँटियागो पेना यांनी व्यक्त केला.आयएमसी सभागृहात आयोजित कार्यक्रमात पॅराग्वे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलाशियास उपस्थित होते. यावेळी आयएमसीचे अध्यक्ष संजय मारीवाला, पॅराग्वेचे शिष्टमंडळ व इतरही उपस्थित होते.

बेलारूस महाराष्ट्राशी सहकार्य वाढविण्यास उत्सुक

मुंबई : बेलारूस महाराष्ट्रासोबत प्रादेशिक स्तरावर सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक असून भारतासोबत डम्प ट्रक निर्यात, संरक्षण उत्पादन, शिक्षण, कृषी व फलोत्पादन, वस्त्रोद्योग, पर्यटन यांसह इतर क्षेत्रात संबंध प्रस्थापित करण्याबाबत प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन बेलारूस प्रजासत्ताकाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलियाक्सांड्र मात्सुकोऊ यांनी येथे केले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video