महाराष्ट्र

अजित पवार म्हणतात, कोण संजय राऊत?; अजित पवार - संजय राऊतांमधील मतभेद पुन्हा समोर

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामधील मतभेद पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले

नवशक्ती Web Desk

गेले काही दिवस शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. आज एका पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्याबद्दल विचारल्यानंतर, 'कोण संजय राऊत?' असा प्रश्न विचारला. त्यानंतर ते म्हणाले की, मी जर कोणाचे नाव घेतले नव्हते. तर कोणाच्या अंगाला काय लागावं? मी माझ्या पक्षासंदर्भात बोललो होतो, त्यामुळे कोणाला काही लागायचं काहीच कारण नाही." असे उत्तर त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये २ महत्त्वाच्या नेत्यांमधला मोठा वाद समोर आला आहे.

आज विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, नाराजीच्या आणि पक्ष बदलाच्या शंकाकुशंका काढून टाका, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच, संजय राऊत यांच्याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी कोण संजय राऊत असा प्रश्न विचारला. याआधी संजय राऊत यांनी माध्यमांसमोर, "कोण अजित पवार? मी फक्त शरद पवारांचे ऐकतो." असे म्हंटले होते. तसेच, त्याआधी संजय राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे मुखपत्र 'सामना'च्या 'रोखठोक' या सदरामध्ये केले होते.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत