Breaking News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंगवेळी अपघात; बारामती विमानतळावरील घटना - Video 
महाराष्ट्र

Breaking News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंगवेळी अपघात; बारामती विमानतळावरील घटना - Video

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या विमानाचा आज (दि.२८) सकाळी बारामती विमानतळावर अपघात झाला आहे. लँडिंगचा प्रयत्न करतेवेळी ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होणार होत्या.

Krantee V. Kale

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या विमानाचा आज (दि.२८) सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर अपघात झाला आहे. लँडिंगचा प्रयत्न करतेवेळी ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होणार होत्या. त्यासाठी ते सकाळी विमानाने बारामती विमानतळावर पोहोचले होते. विमानातील ३ ते ४ जण जखमी झाल्याचं समजतंय.

अपघातस्थळाचे व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. अपघातस्थळाच्या दृश्यांमध्ये विमान जळताना दिसत आहे. माध्यमांतील काही रिपोर्ट्समध्ये अजित पवार या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप या अपघाताबाबत किंवा अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात येत असून, पुढील तपशिलांची प्रतीक्षा आहे.

अधिक माहिती उपलब्ध होताच अधिकारी लवकरच एक अधिकृत निवेदन जारी करतील अशी अपेक्षा आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अन्य काही जण असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar Death : दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नावेळी क्रॅश झाले विमान; पायलटचे अखेरचे शब्द...ओह शिट...ओह शिट

अजित दादांना उद्या अखेरचा निरोप! पार्थिवावर सकाळी ११ वाजता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यसंस्कार

मोठी बातमी! विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

"दिलदार मित्र गेला..." अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांनी व्यक्त केले दुःख; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा; आज शासकीय सुट्टी

उद्ध्वस्त...अजितदादांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंनी एकाच शब्दात व्यक्त केल्या भावना