महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांच्या अडचणी वाढणार? मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेत केला थेट आरोप

नवशक्ती Web Desk

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या बुधवारी प्रकाशित होणाऱ्या मॅडम कमिशनर या पुस्तकात अजित पवारांबाबत केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती. अशात आता बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी मला येरवड्यातील जागा हस्तांतरित करण्यास सांगितली होती. पण मी त्याला नकार दिला होता, असं बोरवणकर म्हणाल्या आहेत.

येरवड्यात असलेल्या पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा आदेश अजित पवारांचा होता, असा थेट आरोप मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर केला आहे. संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे जामगा द्या, असं मला अजित पवारांनी सांगितलं. याला मी नकार दिला. त्यामुळे येरवड्याची जमीन वाचली. मला यात पाडू नका असं सांगण्यात आलं होतं. बिल्डर, राजकारणी आणि पोलिसांची यात मिलीभगत होती, असा थेट आरोप मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

मीरा बोरवणकर यांनी आपल्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात खळबळजनक दावे केले आहेत. यासंदर्भातील त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. २०१० साली वानखेड्यातील जमीन बिल्डरला देण्याचा खाट घालण्यात आला होता. त्यावेळचे पालकमंत्री(अजित पवार) यांनीचं जमीन हस्तांतरण करण्यास सांगितलं होतं. याला माझा नकार होता. त्यावेळी आर आर पाटील यांनी मला यात न पडण्यास सांगितलं असल्याचा दावा बोरवणकर यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, तुमच्यामुळे जमीन वाचली. लिलाव प्रक्रिया योग्य होती तर त्याआधीचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. पुस्तक न वाचताच आरोप केले जात आहेत. माझ्या पुस्तकात एकूण ३८ प्रकरणं आहेत. पण केवळ येरवड्याच्या प्रकरणावरच चर्चा होत असल्याची खंत देखील मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केली.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस