अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन ऑक्टोबरमध्ये; तुषार गांधी यांची माहिती  
महाराष्ट्र

अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन ऑक्टोबरमध्ये; तुषार गांधी यांची माहिती

महात्मा गांधी मिशन आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ ऑक्टोबर रोजी एमजीएम विद्यापीठात दुसरे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ ऑक्टोबर रोजी एमजीएम विद्यापीठात दुसरे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात मराठीसोबतच हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेतून गांधी विचारांवर मंथन होणार असल्याची माहिती महात्मा गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. तुषार गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गांधी म्हणाले की, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सुरू केलेला हा उपक्रम असून, आजच्या काळात तरुणांपर्यंत आणि समाजातील विविध घटकांपर्यंत गांधी विचार पोहोचविणे हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ या नव्या पिढ्यांसाठी महात्मा गांधींचे विचार कोणत्या पद्धतीने मांडता येतील, याचा विचार करून संमेलनातील कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. अन्वर राजन म्हणाले की, महात्मा गांधी यांच्याबाबत विविध प्रकारचा अपप्रचार सुरू असताना त्यांचे खरे विचार समाजासमोर मांडणे हा या संमेलनामागील प्रमुख हेतू आहे. ‘नीट’च्या प्रश्नावरून जंतरमंतर येथे नुकतेच झालेले आंदोलन हा गांधी विचारांचाच आविष्कार असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की, एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनासाठी कोरिया, श्रीलंका, जर्मनी यांसह विविध देशांतील गांधी विचारांचे अभ्यासक उपस्थित राहणार आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या त्या वेळच्या सगळ्या आमदारांना अपात्र करा; सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

मराठवाड्यात दाटले दुष्काळाचे ढग; ११ मोठ्या धरणांमध्ये ६९ टक्के पाणीसाठा

Mumbai : तीन वर्षांत एसी लोकलची तयारी; आयसीएफ १२०, आरसीएफ ७१, एमसीएफ ४७ रेक तयार करणार

महापौरांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड; शैक्षणिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र

व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा; ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम, ३,९९५ वाहनचालकांची तपासणी