महाराष्ट्र

आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र लढावे - शरद पवार

मध्यावधी निवडणुका होतील, असे मी बोललोच नाही. अडीच वर्षे झाली आता केवळ अडीच वर्षे राहिली.

वृत्तसंस्था

२०२४ च्या निवडणुका महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्रित लढाव्यात, अशी आपली इच्छा आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र लढावे, अशी माझी व्यक्तिगत मनस्थिती आहे; पण मी माझ्या पक्षात, काँग्रेस किंवा शिवसेनेशीही बोललो नाही. ती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

“मध्यावधी निवडणुका होतील, असे मी बोललोच नाही. अडीच वर्षे झाली आता केवळ अडीच वर्षे राहिली. त्यामुळे आतापासूनच आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा, असे आदेश मी दिले होते,” अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी रविवारी औरंगाबादेत दिली. पवार म्हणाले, “सत्ता हातातून गेली तेव्हा काही जण अस्वस्थ होते पण आता त्यांच्याकडे सत्ता आल्याने अस्वस्थता कमी झाली असावी, असे मी मानतो. काही जण रात्री भेटत होते. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नींनीही सांगितल्यामुळे त्यात तथ्य असेल. अडीच वर्षे राज्यपालांकडे कष्टांची कामे होती, त्यामुळे त्यांना मविआच्या मागणीकडे लक्ष देता आले नाही; मात्र त्यांनी जे काम अडीच वर्षात केले नाही, ते अध्यक्ष निवडीचे काम दोन दिवसांत केले. पदाची प्रतिष्ठा सांभाळणारे राज्यपाल राज्याला मिळाले.”

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त