एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ; चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ; चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील लिपिक-टंकलेखक पदांच्या खात्यांतर्गत पदोन्नती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील लिपिक-टंकलेखक पदांच्या खात्यांतर्गत पदोन्नती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

एसटी महामंडळातील चालक, वाहक, शिपाई, सहाय्यक आदी तत्सम पदातील कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के पदांवरील पदोन्नती प्रक्रियेत काही विभागांत भ्रष्टाचाराच्या हेतूने गेली तीन, चार वर्षे प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आल्याचा आरोप संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. काही ठिकाणी ज्येष्ठता डावलून, तर काही ठिकाणी नावातील बदलाचे कारण देत नियमबाह्य पद्धतीने कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पात्र ठरविण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

बरगे यांच्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविण्यात आली पाहिजे. कारण प्रत्येक वर्षी रिक्त होणाऱ्या सरळ सेवा भरती मधून २५ टक्के पदे सेवेतील कर्मचाऱ्यामधून भरण्याचे परिपत्रक असून गेली दोन, तीन वर्षे ही प्रक्रिया रखडल्याने अनेक कर्मचारी या पदोन्नती पासून वंचित राहिले आहेत. अशातच गंभीर प्रकरणी एका विभागातील खात्यांतर्गत चौकशीत समितीतील तीन अधिकाऱ्यांवर समान स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली