महाराष्ट्र

हे आमदार कोण, पैशांच्या बंडलसह काय करत आहेत? अंबादास दानवेंचा ऐन अधिवेशन काळात 'कॅश बॉम्ब'; ३ व्हिडिओ केले शेअर

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या तीन व्हिडिओंमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Krantee V. Kale

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या तीन व्हिडिओंमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय म्हणजे व्हिडिओत पैशांच्या बंडलसह दिसणारी व्यक्ती एक आमदार असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे.

"या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही..बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?" असा सवाल दानवे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत विचारला आहे.

आमदार महेंद्र दळवी यांचं दानवेंना ओपन चॅलेंज

महत्त्वाचं म्हणजे दानवे यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलेलं नाही. पण, संबंधित व्हिडिओ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, "नोटांच्या बंडलांसह असलेले व्हिडिओ माझेच आहेत, हे अंबादास दानवेंनी सिद्ध करून दाखवावं" असं ओपन चॅलेंज दळवी यांनी दिले आहे. दानवेंना आता पक्षात कोणीही विचारत नाही. त्यामुळे ते ब्लॅकमेलिंगचे धंदे करत आहेत, असेही ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट दाखवावं तो माणूस कोण आहे, ते नोटांचे बंडल दाखवावेत. कोणाला तरी ब्लॅकमेल करणं हे त्यांचं काम आहे. पण त्यांनी हलक्यात घेऊ नये. आम्हीही त्याच धाटणीचे आहोत. दखल घ्यावी, एवढे ते (दानवे) मोठे नाहीत. मात्र मी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असेही आमदार दळवी यांनी सांगितले.

दानवेंच्या आरोपांनंतर विधानसभेत आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी दानवेंच्या आरोपामुळे अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांना चांगली संधी मिळाली आहे.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले