ANI
महाराष्ट्र

अमित शहांचे विनायक मेटे यांच्या पत्नीसाठी शोकपत्र

14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. बीडहून मुंबईच्या दिशेने जात असताना पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या कारला आयशरची धडक बसली

वृत्तसंस्था

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याची ईश्वर प्रेरणा देवो, असे म्हणत गृहमंत्री अमित शहा यांनी शोकसंदेश पाठवला आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाने आज हा संदेश आला असून अमित शहा यांनी मेटे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. 14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. बीडहून मुंबईच्या दिशेने जात असताना पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या कारला आयशरची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, घटनेनंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळातून नाराजी व्यक्त होत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या वतीने शोक पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, विनायक मेटे यांच्या निधनाची दु:खद बातमी ऐकून दु:ख झाले. महाराष्ट्राच्या राजकारणाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल मला दु:ख आहे. दिवंगत आत्म्याला विनम्र श्रद्धांजली देवाचरणी प्रार्थना.. शोकाकुल परिवार आणि समर्थकांना या संकटाचा धीराने सामना करण्याची शक्ती देवो...अमित शाह यांनी हिंदीतून शोकसंदेश पाठवला.

Thane : दिवाळीतील पाणीकपात रद्द; २ आणि ९ नोव्हेंबरचा शटडाऊन स्थगित

Delhi : रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचा एल्गार; महारॅलीत विरोधकांचे शक्तिप्रदर्शन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

Mumbai : चर्चगेट-विरार लोकलमध्ये तरुणींचे चोरून व्हिडीओ काढले, AI वापरून बनवल्या अश्लील रील्स; धक्कादायक प्रकार उघड

Thane : हरित फटाकेच विकता येणार; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके फोडण्यावर निर्बंध

दिवाळीआधी सर्वसामान्यांच्या खिशाला फटका! गॅस सिलिंडर, CNG महागले; १ नोव्हेंबरपासून कोणते नियम बदलले?