महाराष्ट्र

कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी मेंढपाळाचा मुलगा!

Swapnil S

कराड : साधारणपणे येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या संभाव्य आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचाही समावेश असून त्यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्याच जागेवर कराडपासून केवळ ७ किमी अंतरावरील आबाईचीवडी, तालुका कराड येथील रहिवासी असलेले अमोल येडगे यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल येडगे हे गावातील एका मेंढपाळाचे सुपुत्र असून ते सन २०१४च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.

अमोल येडगे हे मूळचे कराड तालुक्यातील आबईचिवाडी या गावचे रहिवासी आहेत.त्यांनी सन २०१४ मध्ये आयएएस पदावर विराजमान झाल्यानंतर प्रारंभी जळगावमध्ये प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला होता. त्यानंतर कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली होती, तर त्यानंतर त्यांनी आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर ते बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तर डिसेंबर २०२० मध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपली सेवा केली होती. त्यानंतर त्यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती.मात्र, आतापर्यंतच्या कार्यकाळात अमोल येडगे कधीही वादग्रस्त ठरलेले नाहीत. उलट त्यांनी कामगिरी दमदार राहिली आहे.

कराड तालुक्यातील आबईचीवडी हे अमोल येडगे यांचे मूळ गाव असून २०१४ साली ते आयएएस होण्यापूर्वी दिल्लीत राहून त्यांनी युपीएससीचा अभ्यास केला. कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका धनगर समाजातील मेंढपाळाच्या मुलाने युपीएससी उत्तीर्ण होणे, ही येथील मोठी कौतुकास्पद घटना होती. प्रशासकीय कामाला सुरुवात केल्यानंतर उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली. बीडमध्ये जिल्हाधिकारी असताना येथील ऊसतोड मजूरांसारख्या गोरगरीब जनतेनेही त्यांच्या जनताभिमुख कामाचे आजही कौतुक करतात.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त