महाराष्ट्र

अयान अहमद आईचे दागिने विकून करायचा शौक; अमरावती लैंगिक शोषणप्रकरणी धक्कादायक खुलासा

अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत.

Krantee V. Kale

अमरावती : अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. अयानने आपले शौक पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून विकला होता, अशी माहिती हाती आली आहे. त्याच्या सोशल मीडिया रिल्समधे जे नोटांचे बंडल दिसायचे, ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते. अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणे, मुलींवर पैसे खर्च करणे आणि महागडे मोबाईल वापरणे अशा विलासी सवयी होत्या, त्यासाठी त्याने आईचे दागिने चोरल्याचे आणि विकल्याचे उघड झाले आहे

अमरावतीत तरुणींचे लैंगिक शोषण प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा भयाण चेहरा आता समोर आला आहे. पैशासाठी स्वतःच्या आईचे मंगळसूत्र आणि सोन्याचा एक हार त्याने चोरून विकला होता. अयानच्या रिल्स मध्ये असलेले नोटांचे बंडल आईचे मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचे होते अशी माहिती पुढे आली आहे.

सोशल मीडियावर 'फॉलोअर्स' वाढल्याने आश्चर्य

या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर आला असून, विशेष तपास पथकाच्या हाती मोठे तांत्रिक पुरावे लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपी अयान अहमद याच्यावरील गुन्ह्याचे गांभीर्य वाढत असतानाच सोशल मीडियावर त्याची 'क्रेझ' वाढताना दिसत आहे.अयान अहमद याच्या कृत्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच, त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या वाढणे चिंताजनक मानले जात आहे. गुन्हा दाखल झाला तेव्हा अयानचे १८ हजार फॉलोअर्स होते, मात्र अटकेनंतर अवघ्या काही दिवसांत त्यात ४ हजारांची भर पडून हा आकडा २२ हजारांच्या पार गेला आहे. समाजविघातक कृत्य करणाऱ्या आरोपीची ही 'क्रेझ' वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

तांत्रिक तपासात मोठे यश

एसआयटीने या प्रकरणात जप्त केलेल्या पाचपैकी तीन मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात तांत्रिक विभागाला यश आले आहे. या मोबाईलमधील चॅट्स आणि डेटावरून संशयितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि एसआयटी प्रमुख शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक वेगाने कारवाई करत असून, लवकरच काही मोठ्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आतापर्यंत १० संशयितांना अटक

अयान अहमद आणि त्याचा मित्र उजैर खान यांनी केवळ शोषण केले की पीडित मुलींच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणीही केली होती? या दिशेने आता एसआयटीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. आतापर्यंत १० संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर स्थानिक धार्मिक नेतृत्वानेही स्पष्ट भूमिका घेतली आहे. परतवाडा येथील शहर-ए-काजी सय्यद गैसोद्दीन यांनी अयान अहमदच्या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. "आरोपी कोणत्या धर्माचा आहे हे न पाहता त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुस्लिम समाजाने अशा गुन्हेगाराला पाठीशी न घालता त्याच्या शिक्षेसाठी पाठिंबा द्यावा," असे आवाहन त्यांनी केले आहे.

मोबाईल, लॅपटॉप, टॅब, हार्डडिक्स प्रयोगशाळेत

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषद या प्रकरणाची माहिती दिली आहे. १५ वर्षाच्या तरुणीचा आम्ही ऑन रेकॉर्ड जबाब घेतला आहे. यावेळी तरुणीची आई सोबत होती. आठ पीडितपैकी एका पीडितेने जबाब दिला आहे. ही तपासासाठी चांगली गोष्ट आहे. आरोपी क्रमांक दोन उजेर खान याच्या विरोधात एका १६ वर्षीय मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यामुळे एक वेगळा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही जे मोबाईल, लॅपटॉप, टॅब आणि हार्डडिक्स हस्तगत केले ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. ज्या व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी थार गाडीत बसत आहे, त्यात बंदूक ठेवली, नोटांचे बंडल दिसत आहे. ती गाडी राजेश प्रजापती यांची आहे. तो प्रजापती कोण आहे? आणि अयान सोबत त्याचे काय संबंध आहे? याचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट