ANI
ANI
महाराष्ट्र

अनिल परबांच्या अडचणीत वाढ? केंद्र सरकारचे अधिकारी साई रिसॉर्टवर

वृत्तसंस्था

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने परब यांच्या साई रिसॉर्टप्रकरणी चौकशीसाठी नेमलेली समिती साई रिसॉर्टवर दाखल झाली आहे. या टीममध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था व महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत.

रिसॉर्टवर दाखल झालेल्या टीमकडून आतापर्यंत नेमकी काय कारवाई झाली, याची चौकशी सुरू आहे. तसेच पर्यावरणाच्या हानीची या टीमकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुरुडमधल्या साई रिसॉर्टने सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. साई रिसॉर्टमध्ये दाखल झालेली टीम ही रिसॉर्टप्रमाणेच, कोच रिसॉर्टचीदेखील चौकशी करत असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक शिंदेंकडेच! हेमंत गोडसे यांना मिळाली उमेदवारी

अखेर ठरले! महायुतीने ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना दिली उमेदवारी

पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; "वखवखलेला आत्मा..."

LPG Price Cut : व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात; आजपासून लागू होणार नवे दर

आज मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा