टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः अंजनाताईंच्या घरी जाऊन निमंत्रण पत्रिका नुकतीच त्यांना सुपूर्द केली. 
महाराष्ट्र

गणेश मूर्तिकार अंजनाताईंना पंतप्रधानांनी धाडले निमंत्रण; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी असणार विशेष अतिथी

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अंजना कुंभार यांची प्रेरणादायी कहाणी पोहोचली. टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण पत्रिका नुकतीच त्यांना सुपूर्द केली.

Swapnil S

कराड : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मातीतून कलाकृती घडवणाऱ्या सातारा जिल्ह्यातील परळी गावच्या महिला उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात व लाल किल्ल्यावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांनीच निमंत्रित केले आहे. टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन ही निमंत्रण पत्रिका नुकतीच त्यांना सुपूर्द केली.

अंजना कुंभार यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गावापासून सुरू झालेला हा प्रवास राज्यभर पोहोचला आणि त्यांच्या या कार्याची दखल थेट दिल्लीतील सर्वोच्च कार्यालयांनी घेतली. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अंजना कुंभार यांची ही प्रेरणादायी कहाणी पोहोचली.

याच उत्तुंग कामगिरीमुळे त्यांना येत्या १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आणि राष्ट्रपती भवनातील स्वागत समारंभासाठी 'विशेष निमंत्रित' म्हणून बोलावण्यात आले आहे. जिल्ह्यातून हा मान मिळवणाऱ्या त्या एकमेव नवउद्योजिका आहेत.

राष्ट्रपती सचिवालय व पंतप्रधान कार्यालय, नवी दिल्ली येथून आलेली ही विशेष निमंत्रण पत्रिका अंजना कुंभार यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टपाल विभागानेही विशेष आपुलकी दाखवली.

प्रवर अधीक्षक (डाकघर) रत्नाकर टोपारे, उपाधीक्षक मयुरेश कोले, सहाय्यक अधीक्षक संदीप घोडके आणि परळीचे डाक अधिकारी यांनी स्वतः परळी येथील त्यांच्या घरी जाऊन ही पत्रिका सुपूर्द केली.त्यांना मिळालेल्या या सन्मानाचे जिल्ह्यातून कौतुक होत असून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पारंपरिक व्यवसायाचा केला विस्तार

पारंपरिक कुंभार व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी अंजना कुंभार महाराष्ट्र शासनाच्या 'उमेद' अभियानांतर्गत मार्गदर्शन मिळाले. महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 'लखपती दीदी' या योजनेतून आपल्या महिला बचत गटासाठी कर्ज घेतले. या भांडवलाच्या जोरावर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाचा केवळ विस्तारच केला नाही, तर त्याला नवी ओळख दिली.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२