महाराष्ट्र

अण्णा हजारेंनी देशाचे वाटोळे केले -आव्हाड

“अण्णा हजारे या माणसाने संपूर्ण देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणून कुणी गांधी होत नाही,” असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्रआव्हाड यांनी केला आहे.

प्रतिनिधी

मुंबई : “अण्णा हजारे या माणसाने संपूर्ण देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणून कुणी गांधी होत नाही,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या आरोपाने पद्मभूषण अण्णा हजारे दुखावले आहेत. मी देशाचे वाटोळे कसे केले, याचा खुलासा जितेंद्र आव्हाडांनी करावा, असे म्हणत अण्णा हजारे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

“याविषयी आपण कायदेशीर सल्ला घेत आहोत. तसेच हा दावा कुठून आणि कशा पद्धतीने दाखल करायचा, हे आपण लवकरच जाहीर करणार आहोत,” असे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. आव्हाडांनी आता अण्णा हजारे यांच्याशी नवा वाद छेडला आहे. या निमित्ताने दीर्घकाळ प्रसिद्धी झोतात नसलले हजारे या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत.

दिल्ली पोलिसांकडून न्यूजक्लिक या ऑनलाइन पोर्टलवर तसेच पत्रकारांवर सुरू असलेल्या धाडसत्राचा निषेध नोंदवण्यासाठी मुंबईत प्रेस क्लब येथे गुरुवारी संध्याकाळी कँडल मार्च काढण्यात आला. त्यात मुंबईसह राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने भाग घेत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.

मुंबईसह राज्यातील २६-२७ मनपा आम्ही जिंकू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास

गोरगरीबांच्या मोफत उपचारावर संकट

मुंबईची प्रगती - शब्द ठाकरेंचा!

आजचे राशिभविष्य, १४ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Makar Sankranti 2026 : तिळगुळासोबत करा गोड शब्दांची देवाणघेवाण! मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा