FPJ
महाराष्ट्र

साताऱ्यातील न्यायाधीशाला धक्का; लाचप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

लाच घेताना रंगेहात पकडलेल्या साताऱ्यातील न्यायाधीशाच्या जामीन प्रकरणी सोमवारी मुंबई हायकोर्टाने लाचखोरीचा आरोप असलेल्या न्यायाधीशांना जामीन देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली. सातारा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम असे या न्यायाधीशांचे नाव आहे.

Swapnil S

कराड : लाच घेताना रंगेहात पकडलेल्या साताऱ्यातील न्यायाधीशाच्या जामीन प्रकरणी सोमवारी मुंबई हायकोर्टाने लाचखोरीचा आरोप असलेल्या न्यायाधीशांना जामीन देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली. सातारा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम असे या न्यायाधीशांचे नाव आहे.

एका प्रकरणात आरोपीला जामीन देण्याकरिता ५ लाखांची लाच घेतल्याचा न्या. धनंजय निकम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, सातारा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला न्या. निकम यांनी मुंबई हायकोर्टात दिलेली आव्हान याचिका फेटाळण्यात आली. न्या. निकम यांनी त्यांचे निकटवर्तीय खरात बंधूंमार्फत लाच मागितल्याची सातारा एसीबीकडे तक्रार आली होती. सदर तक्रारीनुसार सातारा एसीबीने कारवाई केली होती. मात्र न्या. निकम यांनी सर्व आरोप फेटाळले असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात न्या. निकम यांचा यात सहभाग असल्याचे पुरावे हायकोर्टाकडून ग्राह्य धरण्यात आलेले आहेत.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल