महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतूक ; म्हणाले, "महाराष्ट्राचे..."

मुख्यमंत्र्यांनी देखील पंतप्रधान मोदींचे भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल आभार मानले आहेत

नवशक्ती Web Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान मोदींचे भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल आभार मानले आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांचं ट्विट रिट्विट करत त्यांचं कौतूक केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी मोदी यांच्यासोबत भेटीचे फोटो ट्विट करत लिहलं की, देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आमि सक्षण असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपाणाने विचारपूर केली. माझ्या कुटूंबासोबत निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला, असं ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विट ला रिट्विट करत महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटूंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतूकास्पद आहे. असं म्हटलं आहे.

BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू

आरोपी बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात; हातात बेड्या, गळ्यात दोरखंड, घोषणाबाजी करत अर्ज भरायला गेला, पण...

BMC Election : शिवसेना-मनसे जागावाटप अंतिम टप्प्यात - संजय राऊत

भीमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद; ९ जानेवारीपासून अंमलबजावणी

तुळजापुरात भीषण दुर्घटना! विहिरीतील मोटार काढताना शॉक लागला; बाप-लेकासह चौघांचा मृत्यू