खरातला आमच्या ताब्यात द्या! तृप्ती देसाई आक्रमक; कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा 
महाराष्ट्र

खरातला आमच्या ताब्यात द्या! तृप्ती देसाई आक्रमक; कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा

अशोक खरातला मंगळवारी नाशिक कोर्टात आणले त्यावेळी कोर्टाच्या परिसरात चांगलाच राडा झाल्याचे दिसून आले. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यावेळी चांगल्याच आक्रमक झाल्या आणि अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, त्याला कानाखाली वाजवतो अशी मागणी त्यांनी केली. तसेच हे प्रकरण गेल्या वर्षीच बाहेर आले असते, पण पोलिसांनी सगळे पेन ड्राइव्ह गायब केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Swapnil S

नाशिक : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणी आता वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. अशोक खरातला मंगळवारी नाशिक कोर्टात आणले त्यावेळी कोर्टाच्या परिसरात चांगलाच राडा झाल्याचे दिसून आले. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यावेळी चांगल्याच आक्रमक झाल्या आणि अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, त्याला कानाखाली वाजवतो अशी मागणी त्यांनी केली. तसेच हे प्रकरण गेल्या वर्षीच बाहेर आले असते, पण पोलिसांनी सगळे पेन ड्राइव्ह गायब केल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोर्टाच्या परिसरात मोठी गर्दी

अशोक खरातला मंगळवारी नाशिक कोर्टात दाखल करण्यात आले. त्यावेळी नाशिक कोर्टाच्या परिसरात मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या कोर्टाच्या परिसरात आल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या भोवती कडे करून त्यांना रोखून धरले. तृप्ती देसाई यांनी अशोक खरातला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. खरातने जे काही कृत्य केले आहे त्यावर त्याच्यावर कारवाई होईलच. अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, त्याच्या कानाखाली वाजवू द्या असे त्या म्हणाल्या.

गेल्या वर्षी पकडले असते तर अनेक महिला वाचल्या असत्या...

अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. अशोक खरातला जर गेल्या वर्षीच पकडले असते तर अनेक महिला या वाचल्या असत्या. पोलिसांनी अशोक खरातचे पेन ड्राइव्ह गायब केले नसते, तर अशोक खरातचे कृत्य मागच्याच वर्षीच समोर आले असते असा दावा तृप्ती देसाई यांनी केला. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये खरातचे पेन ड्राईव्ह आमच्याकडे येणार होते. पण आम्हाला जे पेन ड्राईव्ह देणार होते त्यांच्यावरच पोलिसांनी गु्न्हे दाखल केले. हे सगळे खरातला वाचवायला केले गेले असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला.

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश