राहुल शेवाळे संग्रहित छा्याचित्र
महाराष्ट्र

अष्टविनायक मंदिरांचा समावेश केंद्राच्या प्रसाद योजनेत करावा; माजी खासदार राहुल शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांचा समावेश केंद्र सरकारच्या तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन योजना म्हणजेच प्रसाद योजनेत करावा, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली.

Swapnil S

मुंबई : केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांचा समावेश केंद्र सरकारच्या तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन योजना म्हणजेच प्रसाद योजनेत करावा, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याविषयीचे लेखी निवेदन शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना सादर केले आहे.

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी ही अष्टविनायक मंदिरे आपला संस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा आहे. या मंदिरांचा समावेश प्रसाद योजनेत झाल्यास देशभरातील इतर महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांसोबत अष्टविनायक मंदिरे जोडली जातील. इथल्या पायाभूत सुविधांचा विकास होऊन भाविकांना सोई सुविधा उपलब्ध होऊ शकतील. तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असेही शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भाविकांना सुविधा, अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण

केंद्र सरकारने प्रसाद योजनेच्या माध्यमातून देशभरातील तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत तीर्थक्षेत्रांचे संवर्धन करतानाच त्याठिकाणी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे, पर्यटनाला चालना देणे, समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करणे, भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे अशा महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात येतात. त्यामुळे भाविकांनादेखील मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होतात.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड