महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कारकीर्द महिनाभरात संपणार; ॲड. असिम सरोदे यांची ‘एक्स’वर पोस्ट

शिवसेना पक्ष व चिन्ह यावर १५ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना नाव व चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना याकडे सगळ्याच राजकीय पक्षांसह जनतेचे लक्ष लागले आहे. मात्र अंतिम सुनावणी आधीच वकील असिम सरोदे यांच्या एक्सवरील पोस्टने खळबळ उडाली आहे.

Swapnil S

मुंबई : शिवसेना पक्ष व चिन्ह यावर १५ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना नाव व चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना याकडे सगळ्याच राजकीय पक्षांसह जनतेचे लक्ष लागले आहे. मात्र अंतिम सुनावणी आधीच वकील असिम सरोदे यांच्या एक्सवरील पोस्टने खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कारकीर्द महिनाभरात संपणार, असा खळबळजनक दावा वकील असिम सरोदे यांनी केला आहे.

शिवसेना नाव व चिन्ह कोणाचे यावर सर्वोच्च न्यायालयात १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता असून न्यायालयाच्या निकालानंतर खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र न्यायालयाचा निकाल येण्याआधीच वकील असिम सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना महिनाभरात संपणार अशी एक्सवर पोस्ट केली आहे.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास