आगीच्या घटना वाढत असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली. वैजापूर शहरातील एका चारचाकीच्या शोरूमला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. तर अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.
शोरूमला आग लागल्याची माहिती मिळताच अनेक लोक घटनास्थळी जमा झाले. आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. शोरूममध्ये विक्रीसाठी नवीन गाड्या ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आग एवढी भीषण होती की, शोरूममधील सर्वच वस्तू जळून खाक झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शोरूममध्ये ठेवलेल्या ऑईलच्या ड्रमने पेट घेतला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत.