MPSC च्या अध्यक्ष, सचिवांच्या राजीनाम्याची मागणी; पेपरफुटीप्रकरणी शिंदे गटाचे बच्चू कडू आक्रमक (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

MPSC च्या अध्यक्ष, सचिवांच्या राजीनाम्याची मागणी; पेपरफुटीप्रकरणी शिंदे गटाचे बच्चू कडू आक्रमक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न आणि औषध निरीक्षक पदभरतीच्या पेपरफुटी प्रकरणात आयोगातील तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी रविवारी एक्स या समाज माध्यमातून केली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न आणि औषध निरीक्षक पदभरतीच्या पेपरफुटी प्रकरणात आयोगातील तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी रविवारी एक्स या समाज माध्यमातून केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

पोलिसांच्या विशेष पथकाकडून तपास सुरू आहे. आयोगाचे सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे, अवर सचिव अभिजीत लेंडवे यांना अटक केली आहे.

वरिष्ठ आयएएस दर्जाचाच अधिकारी नेमा

एमपीएससीचे अध्यक्ष आणि सदस्य हे राजकीय संपर्क विरहित असणारेच असावेत, तर सचिव हा मंत्रालय कॅडरचा नियुक्त न करता वरिष्ठ आयएएस दर्जाचाच अधिकारी असला पाहिजे, अशी भूमिकाही कडू यांनी मांडली आहे.

विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढू

आयोगाच्या सध्याच्या सहसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांच्या प्रतिनियुक्तीसाठी आयोगाची मान्यता नसताना परस्पर मनमानीपणे मंत्रालयातील अधिकारी एकतर्फी आयोगात पाठवण्याच्या तक्रारीची सखोल चौकशी करावी. या पदावरील व्यक्तीची नियुक्ती नियमबाह्य असल्याने ती तत्काळ रद्द करावी. प्रश्नफुटी संदर्भात प्राथमिक जबाबदारी परीक्षा नियंत्रक यांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशा मागण्या कडू यांनी केल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : मित्रानेच केला गेम! फेसबुक किंग बंटी दीक्षितचा निर्घृण खून; आधी कारने स्कूटरला उडवलं, नंतर...

सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध; दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका, निवडणुकीत मोठी माघार

Wardha : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरला लगावली जोरदार थप्पड; डॉक्टरांकडून कारवाईची मागणी, CCTV व्हिडीओ व्हायरल

Mumbai : भुलेश्वरमध्ये जुन्या भूमिगत केबल्स बदलणार; २०० कोटी रुपये खर्च, बेस्टचा निर्णय

Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी