महाराष्ट्र

माजी आमदार बाळासाहेब दांगट ‘डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित; सामाजिक कार्य, जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव

जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट, शिवनेर भूषण, माजी आमदार बाळासाहेब दांगट यांना सामाजिक कार्य व जनसंपर्क क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट, शिवनेर भूषण, माजी आमदार बाळासाहेब दांगट यांना सामाजिक कार्य व जनसंपर्क क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान करण्यात आली. मुंबईतील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये रविवारी झालेल्या फ्रान्स, पॅरिसच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी डॉक्टोरल मॉनिटरिंग बोर्डच्या आणि इंडो-युरोपियन परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्यांचा गौरव करण्यात आला.

या गौरवाने केवळ बाळासाहेब दांगट यांचेच नव्हे तर संपूर्ण जुन्नर तालुक्याचे नाव उजळले आहे. विविध संस्था, संघटना आणि लोकांकडून त्यांना याआधीही अनेक सन्मान मिळाले असले तरी ही डॉक्टरेट पदवी त्यांच्या कार्याची शास्रीय मान्यता आणि राष्ट्रीय पातळीवरील कृतज्ञता ठरली.

गेली ३५ वर्ष जुन्नर तालुकाच नव्हे तर उत्तर पुणे जिल्हा (जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर) तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई रहिवासी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यांची निरपेक्ष, निरागस, प्रामाणिकपणे विश्वासपूर्वक सेवा करून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात काम करून एक वेगळाच राजकीय पायंडा घालून दिला.

या कार्यक्रमाला डॉ. नासील हुसीन अफिझाद्दीन, डॉ. राखी कालेस्कर, डॉ. प्रियदर्शनी नायक, डॉ. हरबन्स लाल कायला, डॉ. अमित बागवे, जॉ. अब्बास लोखंडवाला, डॉ. शरद जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. त्याचबरोबर मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि वृत्तपत्र वितरक बाजीराव दांगट, मंदाकिनी दांगट, निलेश दांगट, विजयश्री दांगट आणि ईश्वरी दांगट हेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

नुकतेच ‘शिवनेर भूषण’ पुरस्काराने सन्मानित

नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत दांगट यांना ‘शिवनेर भूषण’ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश