एक्स @MeNarayanRane
महाराष्ट्र

साहेबांनी ४६ वर्षात जे मिळवले, ते उद्धवनी अडीच वर्षांत गमावले - नारायण राणे

साहेबांनी ४६ वर्षात जे मिळवले, ते उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत गमावले, असा टोला भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलताना लगावला.

Swapnil S

अहिल्यानगर : साहेबांनी ४६ वर्षात जे मिळवले, ते उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत गमावले, असा टोला भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलताना लगावला.

राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे आधी दोन्ही हात वर करून बोलत असायचे. मात्र, आता ते हात एकदम छोटे झाले. त्यामुळे उद्या स्वबळावर लढून काय होणार? स्वबळाची ताकद त्यांची राहिली नाही. तर संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका, असे ते म्हणाले.

शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोसत होते? कोणकोणत्या माफियांना संजय राऊत भेटत होते? कोणती तीर्थयात्रा केली म्हणून त्यांना जेलचा पुरस्कार मिळाला होता? हे त्यांना आधी सांगावे. शिवसेनेत बोलायला माणूस नसल्यामुळे व राऊतांना कामधंदा नसल्याने ते असे बोलतात, अशी टीका राणे यांनी केली.

पक्षाचे नेते घेतील तो निर्णय मान्य

भाजपच्या ठाकरे गटाशी वाढलेल्या जवळकीवर बोलताना नारायण राणे म्हणाले की, मला बरं वाटतंय, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. तो जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती स्वबळावर लढणार की नाही हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. ते आता सांगता येणार नाही.

Mumbai : कंत्राटदारांना १२.५ कोटींचा दंड; मेट्रो मार्गिका ९ वर सुरक्षेचा भंग

Navi Mumbai : क्रेन कोसळून दोघा कामगारांचा मृत्यू

Pune : उत्सवामध्ये लाऊडस्पीकरच्या मर्यादांचे पालन करा! गिरीश महाजन यांचे आवाहन

Goa : अभिनेत्याच्या कारची बाप-लेकाच्या दुचाकीला जोरदार धडक; मदतीऐवजी स्थानिकांशी वाद, पत्नीवरही 'थुंकल्याचा' आरोप

विकसित भारतासाठी बँकिंग! सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा