नितेश राणे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

दहावी-बारावी परीक्षेत बुरख्यावर बंदी घाला-नितेश राणे

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत परीक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता दिल्याचे परिपत्रक आहे.

Swapnil S

मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत परीक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता दिल्याचे परिपत्रक आहे. असे लांगूलचालन चालणार नाही, अशी भूमिका घेत दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालून बसण्यावर बंदी घालावी, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. नितेश राणे म्हणाले की, हा निर्णय २०२४ सालचा आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये नेमके तेच विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत का?, हे देखील पाहावे लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये. विशिष्ट धर्माचे लांगुलचालन होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. बुरखा घालून परीक्षेला बसण्याचे इतरही अनेक धोके आहेत. त्याचा विचार करून बुरख्याची परवानगी देणारे परिपत्रक काढले असेल तर ते तत्काळ रद्द करा, असे राणे म्हणाले.

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

Noida Bus Fire : 'ती उतरल्यावरच मी उतरेन'; जळत्या बसमधून स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी आईसोबत थांबला, मायलेकांचा करुण अंत

Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO