महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’वरून श्रेयवादाची लढाई

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान' या नावाने योजनेवर आपला हक्क बजावला आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान' या नावाने योजनेवर आपला हक्क बजावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेने लाडकी बहीण योजना हायजॅक केल्याने महायुतीत लाडकी बहीण योजनेवरून वादाची ठिणगी पडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान राज्यातील घराघरात पोहोचवण्यासाठी विभाग निहाय संपर्क महिला समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून महायुतीतील तिन्ही पक्षांनी लाडकी बहीण योजना आपलीच असा आव आणण्याचा प्रयत्न सुरू केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'अजितदादांची लाडकी बहीण' अशी जाहिरातबाजी केली. यानंतर महायुतीत अजित पवारांविरोधात धुसफूस सुरू झाली.

'लाडकी बहीण संपर्क अभियान'

लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत तणाव निर्माण झाला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान राबवत लाडकी बहीण योजनेवर एकप्रकारे दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी