मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भात केलेले दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असा खुलासा बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केला आहे. 
महाराष्ट्र

कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेले नाही! बीड जिल्हा प्रशासनाचा खुलासा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून बीड जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नाही. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी या संदर्भात विविध वृत्तवाहिन्यांवर केलेले दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असा खुलासा बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केला आहे.

Swapnil S

मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून बीड जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नाही. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी या संदर्भात विविध वृत्तवाहिन्यांवर केलेले दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असा खुलासा बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केला आहे.

याबाबत स्वामी यांनी महसूल मंत्र्यांच्या कार्यालयाला चौकशी अहवालात केला आहे. या अहवालात माजलगाव नगर परिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेविका रेखा अंबुरे यांनी मौजे खळवट लिमगाव (ता. वडवणी) येथील कुणबी नोंद असलेला ‘नमुना-३३’ जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अर्जदारांचे प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्र नोंदवून घेतले.

तक्रार अर्जावर चौकशीचे निर्देश दिले होते, रद्दचे नाही

माजलगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुमन माणिकराव मुंडे यांनी महसूल मंत्र्यांकडे या प्रकरणी एक अर्ज सादर केला होता. महसूल मंत्र्यांनी या अर्जावर केवळ चौकशी करावी, अशा स्वरूपाचा शेरा देऊन तो अर्ज बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. महसूल मंत्र्यांनी केवळ आलेल्या तक्रार अर्जावर चौकशीचे निर्देश दिले होते. प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले नव्हते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी

Mumbai : पालिका सुरक्षा रामभरोसे; ४,०७६ मंजूर पदांपैकी २,३७९ रिक्त; अवघे १,६९७ सुरक्षारक्षक कार्यरत

Ulhasnagar : उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी वृक्षांच्या अस्तित्वावर घाला! महापालिकेच्या कारभारावर पर्यावरणप्रेमींचा आक्षेप

Mumbai : २.२७ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई; मध्य रेल्वेची १५ दिवस विशेष तपासणी मोहीम; २४.७४ कोटींचा दंड वसूल