अदिती तटकरे 
महाराष्ट्र

लाभार्थी 'लाडक्या बहिणी' घटल्या…अपात्र ठरलेल्यांकडून पैसे परत घेणार नाही - अदिती तटकरे

महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर २०२४ मध्ये २.४६ कोटी होती.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर २०२४ मध्ये २.४६ कोटी होती. गेल्या महिन्यात ती २.४१ कोटींवर आली आहे. विविध कारणांमुळे पाच लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

गेल्या वर्षी जुलै ते डिसेंबरदरम्यान या महिलांच्या खात्यात एकूण ४५० कोटी रुपये वर्ग करण्यात आले. मात्र, सरकारने हे पैसे परत घेण्याचा कोणताही विचार केलेला नाही, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. पात्रतेसाठी इतर अटींमध्ये चारचाकी वाहन नसणे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसणे यांचा समावेश आहे. पाच लाख अपात्र ठरलेल्या महिलांमध्ये १.५ लाख महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त होते. तर १.६० लाख महिलांकडे चारचाकी वाहन होते किंवा त्या 'नमो शेतकरी योजना'सारख्या अन्य शासकीय योजनेच्या लाभार्थी होत्या, असे विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय जवळपास २.३० लाख महिला या 'संजय गांधी निराधार योजना'च्या लाभार्थी असल्याने त्यांना 'लाडकी बहिण' योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले, असेही हा अधिकारी म्हणला.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या 'लाडकी बहिण' योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सक्षम बनवणे हा आहे. ही योजना महायुतीच्या नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी महत्त्वाचा घटक ठरल्याचे मानले जात आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने २८८ सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीत २३० जागा जिंकल्या.

ज्या महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहेत त्यांना पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र आधी जमा केलेले पैसे परत घेणे योग्य ठरणार नाही.

- अदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा