भास्कर जाधव संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांना पसंती; ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र, विधानसभेत विरोधी पक्षनेता होण्याइतकेही संख्याबळ विरोधकांकडे नसतानाही, शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही आहे.

Swapnil S

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र, विधानसभेत विरोधी पक्षनेता होण्याइतकेही संख्याबळ विरोधकांकडे नसतानाही, शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही आहे. मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत ठाकरेंच्या शिवसेनेने भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्रही दिले आहे. आता ठाकरे गटाला विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा मान द्यायचा की नाही, याचा निर्णय विधानसभाध्यक्षांना घ्यावा लागणार आहे.

अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच विरोधी पक्षनेता कोण होणार, यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जात होता. अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमवेत अनेक नेत्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ हे महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे आतापर्यंत विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावरून अनेक दावे केले जात होते. मविआमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे सर्वाधिक २० जागा असल्याने शिवसेना ठाकरे गटाने यावर दावा केला आहे. अखेर याबाबतचे पत्र दिल्यानंतर आता त्यावर अंतिम निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.

अडीच वर्षांचा कुठलाही फॉर्म्युला नाही - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी अधिवेशनासाठी विधिमंडळात आले होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात शिवसेना आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड बैठकीस उपस्थित होते. “महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत आम्ही पुढची वाटचाल एकत्रच करणार आहोत. इतर काही गोष्टींवर आमची चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची मागणी आम्ही केलेली आहे. त्यामुळे लवकरच लोकशाही मूल्यांचे पालन करून याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी आम्हाला खात्री आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, सोमवार, १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून त्याआधी विरोधी पक्षनेता जाहीर होईल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य