महाराष्ट्र

भुजबळांच्या अडचणी वाढणार? माफीचा साक्षीदार होण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासंबंधी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला.

Swapnil S

नागपूर : महाराष्ट्र सदन घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी त्यांना या अगोदर तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांची नुकतीच बेकायदेशीर मालमत्तेच्या खटल्यातून सुटका झाली आहे. त्यातच आता महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. आता हा अर्ज कोर्टाने मंजूर केला असून, या अर्जावर सुनावणी घेण्याची विनंती मान्य केली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप आहे. या आरोपावरून त्यांच्यावर धडक कारवाई करतानाच दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली होती. मात्र, त्यानंतर ते बाहेर आले असून, पुन्हा ते राजकारणात सक्रीय झाले. त्यातच आता भुजबळ यांच्यासह इतर काही आरोपींनी या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता भुजबळ या प्रकरणातून दोषमुक्त होतात का, अशी चर्चा रंगली होती. मात्र, त्यातच या प्रकरणात अटकेत असलेले आणखी तीन आरोपी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज यांनी माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या न्यायालयापुढे दाखल केला आणि भुजबळांच्या दोषमुक्तीच्या अर्जाची सुनावणी घेण्याअगोदर माफीचा साक्षीदार म्हणून आमच्या अर्जावर निर्णय घेण्याची विनंती केली. विशेष कोर्टाने ही विनंती मान्य केली असून, लवकरच सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ईडीला उत्तर देण्याचा आदेश

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासंबंधी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. हा अर्ज मंजूर करून सुनावणी करण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आणि त्यानंतर लगेचच यासंबंधी उत्तर सादर करण्याचा आदेश ईडीला दिला. त्यामुळे ईडी यावर काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, अटकेत असलेल्या तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याने भुजबळांचा पुढचा मार्ग खडतर होऊ शकतो.

Pune Traffic Update : नववर्षाच्या जल्लोषासाठी फिरायला जाताय? मग त्याआधी पुण्यातील वाहतुकीचे 'हे' बदल वाचाच

राज्य निवडणूक आयोगाकडून BMC निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती; इक्बाल सिंग चहल यांच्यावर मोठी जबाबदारी

"ही तर इच्छाधारी मेट्रो..." ; एकता कपूरच्या Naagin 7 चं हटके प्रमोशन, व्हायरल Videoवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

BMC Election 2026 : भाजपकडून १३६ उमेदवार निश्चित; कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार, वाचा सविस्तर

धावत्या व्हॅनमध्ये तरुणीवर गँगरेप; लिफ्टच्या बहाण्याने गाडीत बसवलं अन्...