महाराष्ट्र

शरद पवारांना मोठा धक्का: अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; निवडणूक आयोगाचा निकाल

निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात असून निवडणुका तोंडावर असल्याने त्यांना नवीन नाव आणि चिन्हासह निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

Rakesh Mali

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून पक्षावर दावा सांगण्यात आला. यानंतर खरा पक्ष कोणाचा हे ठरवण्यासाठी हे प्रकरण निवडणूक आयोगात गेले. यावर निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. आयोगाने अजित पवार गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची मान्यता दिली असून राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शरद पवार गटाला उद्या (७ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजेपर्यंत नवीन नाव आणि चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आले आहे. आयोगाने दिलेला निकाल हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात असून निवडणुका तोंडावर असल्याने त्यांना नवीन नाव आणि चिन्हासह निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

अजित पवार यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे ४१ आमदार अजित पवारांसोबत गेले तर उर्वरित आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले. याप्रकरणी आयोगासमोर तब्बल १० वेळा सुनावणी झाल्यानंतर आज आयोगाने अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे सांगत पक्षाचे चिन्हही त्यांना दिले आहे.

देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक-

आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निकाल दिल्यानंतर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. बैठकीत निकाल आणि पुढील रणनीती, राज्यसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीसह छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा निकाल आल्याने नव्या पक्ष आणि चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाण्याचे शरद पवार गटासमोर मोठे आव्हान असणार आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?