महाराष्ट्र

दोन ते तीन दिवसांत भाजपचे सरकार स्थापन होईल - रावसाहेब दानवे

दानवे यांनी दोन ते तीन दिवसांतच राज्यात सत्तास्थापनेचे संकेत दिले आहेत.

वृत्तसंस्था

राज्यात सत्तानाट्याचा खेळ सुरू असतानाच येत्या दोन ते तीन दिवसांत भाजपचे सरकार स्थापन करण्यात येईल, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे यांनी टोपे यांना उद्देशून जालना जिल्ह्यात जी कामे करायची असतील, ती करून टाका. राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून मी फक्त दोन ते तीन दिवस विरोधी पक्षात आहे, अशा प्रकारचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी राजेश टोपे यांना उद्देशून केले. दानवे यांनी दोन ते तीन दिवसांतच राज्यात सत्तास्थापनेचे संकेत दिले आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता दानवे यांनी फेटाळून लावली. तसेच शिंदे गटाशी युती करायची की नाही, याबाबत भाजपचे राज्यातील नेते निर्णय घेतील, असे दानवे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची गुजरातमध्ये कोणतीही भेट झाली नाही, असे स्पष्ट केले. “आमच्या पक्षाच्या बैठका सुरू असल्या तरी राज्यातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. राष्ट्रवादी कायदेशीर लढाई त्यांच्या पद्धतीने लढणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे,” असेही ते म्हणाले.

५० हजारांवरील व्याजावर TDS कपात; ज्येष्ठ नागरिकांसाठी १ लाखपर्यंत सवलत

Mumbai : 'मेट्रो वुमन' अश्विनी भिडे बनल्या पहिल्या महिला BMCआयुक्त; आज पदभार स्वीकारणार

"लोक एकमेकांवर पडत होते..." बिहारमध्ये शीतला मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; ८ महिलांचा मृत्यू, अनेक जखमी; Video

'रेडी रेकनर' दरवाढ माफक राहणार?­ महागाई व जागतिक अनिश्चिततेचा परिणाम

Bigg Boss Marathi 6 : ‘घटस्फोटाचा मुद्दा काढत मर्यादा ओलांडल्या...राकेश-विशालच्या हाणामारीवर बापट कुटुंबीयांचा संताप; कारवाईची मागणी