महाराष्ट्र

भाजपच्या खराब कामगिरीला राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी कारणीभूत; रा. स्व. संघाशी संबंधित साप्ताहिकाचे निष्कर्ष

Swapnil S

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची कामगिरी असमाधानकारक होण्याचे खापर रा. स्व. संघाशी संबंधित एका मराठी साप्ताहिकाने राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले आहे. भाजपने अजित पवार यांच्याशी हातमिळवणी केल्याने जनभावना पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेली, असेही या साप्ताहिकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

याबाबत साप्ताहिकाच्या प्रतिनिधींनी भाजपचे सदस्य आणि इतरांशी चर्चा केली, तेव्हा त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास अनुकूलता दर्शविली नव्हती, असे दिसून आले. पक्षात खदखदत असलेला असंतोष हे केवळ हिमनगाचे टोक आहे, तर निर्णयप्रक्रिया आणि कारभार याबाबत पक्ष कार्यकर्त्यांना महत्त्व दिल्याने मध्य प्रदेशात भाजपची कामगिरी लक्षणीय झाली, असेही साप्ताहिकाने म्हटले आहे.

मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास २०० जणांशी अनौपचारिक चर्चा केल्यानंतर 'विवेक' साप्ताहिकाने हा लेख प्रसिद्ध केला आहे. जो भाजपमध्ये आहे अथवा संघ परिवाराशी संबंधित संघटनांशी संलग्न आहे, अशा प्रत्येकाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणे अनुचित असल्याचे म्हटले आहे.

भाजप व शिवसेना युती नैसर्गिक

हा लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी आम्ही जवळपास २०० उद्योगपती, व्यापारी, डॉक्टर, प्राध्यापक आणि शिक्षकांशी चर्चा केली. भाजप आणि शिवसेनेची युती नैसर्गिक होती, कारण ती हिंदुत्वाच्या धाग्याने जोडली गेली होती. मात्र, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर जनभावना पूर्णपणे विरोधात गेली, असेही लेखामध्ये म्हटले आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था