महाराष्ट्र

‘सगेसोयरे’ जीआरची प्रत जाळली; ओबीसी समाजातर्फे निषेध आंदोलन

कुणबी समाज नेते प्रकाश अण्णा शेंडगे व महाराष्ट्र ओबीसी एकीकरण समिती पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आझाद मैदान जवळ सभा घेण्यात आली

Swapnil S

मुंबई : मराठा समाजाला वेगळे स्वतंत्र १० टक्के आरक्षण देणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करीत मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे जीआरची प्रत आझाद मैदानजवळ ओबीसी कार्यकर्त्यांनी मंगळवारी जाळली.

कुणबी समाज नेते प्रकाश अण्णा शेंडगे व महाराष्ट्र ओबीसी एकीकरण समिती पदाधिकारी यांच्या नेतृत्वाप्रकाश शेंडगे यांनी आझाद मैदानाजवळील सभेत बोलताना सांगितले की, मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करण्यासाठी सरकारने विशेष सत्र आयोजित केले आहे आणि त्यामध्ये चूक झाली आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु ते कुणबी समाजातून नाही. सरकार कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी वर्गात समाविष्ट करण्याचे कायदे तयार करत आहे. जरांगे-पाटील सरकारला आव्हान देत आहेत आणि उपोषणाचा ढोंग करत आहेत. मराठा समाज हा श्रीमंत समाज असून, तो आमच्यासाठी मोठा भाऊ आहे आणि त्यांनी आमच्या हिस्स्यातील आरक्षण घेऊ नये. प्रकाश अण्णा शेंडगे यांनी इशारा दिला की, जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले तर ओबीसी समाज येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानाचा बहिष्कार करेल. कुणबी समाजाचे नेते राजाराम पाटील, चंद्रकांत बावकर, वैशालीताई घरत, कुणबी एकीकरण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक वालम, कार्याध्यक्ष विश्वनाथ पाटील, सरचिटणीस प्रकाश बांगर, कुणबी समाज संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्यासह इतर मान्यवर या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.

मतदार आज 'राजा'; मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक; साडेतीन कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

'आता नाही तर कधीच नाही'चा संघर्ष...

स्त्रियांवरील अत्याचारांच्या विरोधातील सापेक्षता

आजचे राशिभविष्य, १५ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हिवाळ्यात नाश्त्यासाठी बनवा गरमागरम कोबी-मटार पराठे; जाणून घ्या रेसिपी