महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी बीड इथं नागरिकांचा कँडल मोर्चा ; व्हिडिओ झाला व्हायरल....

या आंदोलनास पाठिंबा म्हणून बीड येथील मराठा समाजातील नागरिकांनी कँडल मार्चचे आयोजन केलं

विक्रांत नलावडे

राज्यात पुन्हा नव्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी' सरकारला ४० दिवस दिले होते पण त्या दिवसांत सरकारनं काही ठोस असा निर्णय घेतला नसल्यान राज्यात परत एकदा मराठा समजा आक्रमक झाला आहे. जरांगे यांनी अंतरवली सराटी इथं परत आमरण उपोषणाला बसले आहेत. तरी राज्यात अनके ठिकठिकाणी मोर्चे प्रचार सुरु आहेत . लोक आरक्षणासाठी जीव देखील देतं आहेत . तरी सरकार कोणते पाऊल उचलायला तयार नाही.

मराठा आरक्षण आंदोलन राज्यभर आता तापण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळू लागली आहे. त्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपाचर करण्यासाठी डॉक्टर रवाना झाले आहेत. मात्र, जरांगे हे सतत उपचार करण्यास नकार देत आहेत . आरक्षण हाच माझ्यावरील उपचार आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनास पाठिंबा म्हणून बीड येथील मराठा समाजातील नागरिकांनी कँडल मार्चचे आयोजन केलं होत . या मोर्च्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या मोर्चाचा एक व्हिडिओ 'वृत्तसंस्था एएनआय'ने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

'त्या' ७०६ झाडांबाबत सविस्तर अहवाल सादर करा; हरित लवादाचे BMC ला निर्देश; पर्यायाबाबत विचारणा

BMC Election : मुंबई फक्त राजकीय आखाडाच आहे का?

BMC Election : ठाकरे बंधूंची तोफ आज शिवतीर्थावर धडाडणार