एक्स @SandeepTikate
महाराष्ट्र

कॅप्टन दामिनी देशमुख करणार वायुदलाच्या पथसंचलनाचे नेतृत्व

बीड जिल्ह्याला अभिमान वाटावा, अशी वडवणी तालुक्यातील देवडी या गावची दामिनी दिलीप देशमुख ही २६ जानेवारीला कर्तव्यपथावर होणाऱ्या भारतीय सेनेच्या विविध सैन्याचे पथसंचालन करण्यात येते.

Swapnil S

बीड : बीड जिल्ह्याला अभिमान वाटावा, अशी वडवणी तालुक्यातील देवडी या गावची दामिनी दिलीप देशमुख ही २६ जानेवारीला कर्तव्यपथावर होणाऱ्या भारतीय सेनेच्या विविध सैन्याचे पथसंचालन करण्यात येते. यावर्षी वायुदलाच्या तुकडीच्या पथसंचलनाचे नेतृत्व दामिनी दिलीप देशमुख करणार आहे. मराठवाड्यातील पहिली मुलगी दामिनी ही वायुसेनेत देशसेवेसाठी दाखल झाली.

लहानपणापासूनच तिचे ध्येय सैन्यात अधिकारी म्हणून भरती होण्याचे होते. त्यासाठी तिने कठोर परिश्रम घेतले. सैनिक शाळेमध्ये असताना सर्व प्रशिक्षण घेतले. तिचे वडील माजी न्यायमूर्ती दिलीपराव देशमुख व आई यांनी तिला पाहिजे ते सर्व करण्यासाठी सहकार्य केले. तिने एसएसबी निवड परीक्षा देऊन अत्यंत खडतर कठोर परिश्रम घेतले व भारतीय वायुदलात सहभागी झाली. याही ठिकाणी दैदीप्यमान यश तिने प्राप्त केले व यावर्षी २६ जानेवारीला कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचालनासाठी टीमचे नेतृत्व करण्यासाठी तिची निवड झाली. ही नुसत्या बीड जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या यशाबद्दल माझी न्यायमूर्ती दिलीपराव देशमुख, महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉ. सुरेश खु, पत्रकार रामभाऊ कुलकर्णी, कल्याण कुलकर्णी, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर, रक्षामंत्री पदक मेजर एस. पी. कुलकर्णी, जय हिंद ग्रुपचे सुभाष शिंदे, भागवत मसने, प्राचार्य रमण देशपांडे, डॉ. प्रवीण भोसले, संतोष चौधरी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी

संजय केळकरांनी चमत्कार करून दाखवावाच; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा सूचक टोला

नवी मुंबई विमानतळाच्या उड्डाणाला अखेर मुहूर्त! २५ डिसेंबरपासून उड्डाण; अकासा एअर, इंडिगोचे वेळापत्रक अखेर जाहीर

भायखळ्यात मलबा कोसळून दोन मजुरांचा मृत्यू