महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा

Swapnil S

नवी दिल्ली : भाजपच्या नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध बुधवारी नव्याने एफआयआर नोंदविला आहे.

जवळपास दोन वर्षांच्या प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयने एफआयआर नोंदविला आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला होता त्यानंतर चौकशी करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज लि. या शैक्षणिक संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी भाजप नेते आणि इतरांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकविण्यासाठी देशमुख यांनी कट रचल्याचे सीबीआयच्या प्राथमिक चौकशीतून सकृतदर्शनी दिसत आहे, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

भाजपच्या दडपशाहीविरुद्ध लढणार - देशमुख

दरम्यान, हा एफआयआर निराधार असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. जनमत पाहिल्यानंतर फडणवीस यांच्या पायाखालील जमीन सरकू लागल्याने कारस्थान सुरू झाले, आपण असल्या दबावाला भीक घातल नाही, भाजपच्या या दडपशाहीविरोधात आपण लढण्याचा निर्धार केला आहे, असे देशमुख यांनी एक्सवर म्हटले आहे. फडणवीस महाराष्ट्रात किती खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत ते जनता पाहात आहे, असेही माजी गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत