प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या वर्षी सीबीएसईचा निकाल ९३.७० टक्के लागला आहे.

Swapnil S

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या वर्षी सीबीएसईचा निकाल ९३.७० टक्के लागला आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या दहावीचा निकाल ९३.६६ टक्के होता, त्या तुलनेत यंदा निकालात सुधारणा झाली आहे.

बोर्डाने यावेळी उत्तरपत्रिकांची तपासणी विक्रमी वेळेत पूर्ण करत निकाल दरवर्षीच्या तुलनेत १ महिना अगोदर जाहीर केला आहे.

सीबीएससीची बोर्डाची परीक्षा १७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. एकूण २४,७१,७७७ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यामध्ये २३,१६,००८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील सीबीएसईच्या दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी अधिक आहे. सीबीएसईने अधिकृतपणे टॉपर यादी जाहीर केली नाही.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम