लोणावळा कर्जत मार्गावर २४ जुलैपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द 
महाराष्ट्र

लोणावळा कर्जत मार्गावर २४ जुलैपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द

लोणावळा-कर्जत घाट विभागातील तिसरी रेल्वे मार्गिका पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने २४ जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत.

Swapnil S

मुंबई : लोणावळा-कर्जत घाट विभागातील तिसरी रेल्वे मार्गिका पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने २४ जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. कर्जत-लोणावळा दरम्यानचा 'दक्षिण-पूर्व डाऊन' मार्ग आणि 'मध्य मार्ग' यशस्वीरित्या पूर्ववत करण्यात आला असून, अनेक गाड्यांची वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र तिसरी मार्गिका पूर्णपणे सुरू होईपर्यंत काही गाड्या रद्द, काहींचे शॉर्ट टर्मिनेशन, शॉर्ट ओरिजिनेशन तसेच मार्गात बदल करण्यात आले आहेत.

'डाऊन' दिशेच्या रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक २२१५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चेन्नई एक्सप्रेस २४ जुलैपर्यंत, गाडी क्रमांक ११०४१ दादर - साईनगर शिर्डी एक्सप्रेस १८, २१, २२ आणि २३ जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ११०२७ दादर सातारा एक्सप्रेस १९, २० आणि २४ जुलै रोजी, गाडी क्रमांक २२७३२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हैदराबाद एक्सप्रेस २४ जुलैपर्यंत, गाडी क्रमांक २२९४३ दौंड इंदूर एक्सप्रेस २४ जुलैपर्यंत, गाडी क्रमांक २०४९६ हडपसर जोधपूर एक्सप्रेस २४ जुलैपर्यंत आणि गाडी क्रमांक १७४११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस १८ जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

तसेच अप मार्गावरील गाडी क्रमांक २२१५८ चेन्नई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस २४ जुलैपर्यंत, गाडी क्रमांक ११०४२ साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस १९, २२, २३ आणि २४ जुलै रोजी, गाडी क्रमांक ११०२८ सातारा - दादर एक्सप्रेस १८, २०, २१ आणि २५ जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला

माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर नको; सर्व काही ठप्प करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

इंडिया आघाडीचे नेते भेटले राष्ट्रपतींना, मतचोरीचा मुर्मू यांनी इन्कार केला नाही - राहुल गांधी

'एसटी'च्या भूखंडांवर व्यावसायिक इमले; प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक