(प्रातिनिधिक छायाचित्र)
(प्रातिनिधिक छायाचित्र)
महाराष्ट्र

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता 'या' स्थानकांवर स्वस्त दरात भोजन; २० ते ५० रुपयांमध्ये नाश्ता आणि जेवणही

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) सहकार्याने प्रवाशांसाठी स्वस्त दरात जेवण उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार अनारक्षित डब्यांमध्ये स्वस्त दरात जेवण आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २० ते ५० रुपयांमध्ये रेल्वे प्रवाशांना जेवण उपलब्ध होणार आहे.

उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना स्वस्तात जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. यासाठी रेल्वेच्या अनारक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परवडणाऱ्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या खिशाला परवडेल अशा २० रुपये किमतीमध्ये नाश्ता मिळेल, तर न्याहारी, जेवणासाठी ५० रुपयांचा दर असेल.

नाश्ता, जेवण आणि पाणी प्लॅटफॉर्मवरील अनारक्षित डब्यांच्या जवळ असलेल्या काऊंटरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

खालील स्थानकांवर उपलब्ध आहेत खास फूड काऊंटर?

मुंबई विभाग - इगतपुरी आणि कर्जत

भुसावळ विभाग - मनमाड, खंडवा, बडनेरा आणि शेगाव

पुणे विभाग - पुणे, मिरज, दौंड आणि साईनगर शिर्डी

नागपूर विभाग - नागपूर आणि वर्धा

सोलापूर विभाग - सोलापूर, वाडी आणि कुर्डुवाडी

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!