महाराष्ट्र

मध्य रेल्वे चालवणार आषाढी विशेष गाड्या, पंढरपूर, मिरजसाठी ६४ गाड्या

मध्य रेल्वेने आषाढीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर व मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेने आषाढीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर व मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नागपूर मिरज विशेष (२ सेवा), नागपूर मिरज विशेष (२ सेवा), नवी अमरावती - पंढरपूर विशेष (४ सेवा), खामगाव पंढरपूर विशेष (४ सेवा), लातूर - पंढरपूर (१० सेवा), भुसावळ पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा), मिरज - पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा), मिरज कुडूवाडी अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा) या सेवांचा यात समावेश आहे.

नागपूर - मिरज विशेष (२ सेवा) गाडी क्रमांक ०१२०५ विशेष १४ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०६ विशेष १८ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल. नागपूर मिरज नविशेष (२ सेवा) गाडी क्रमांक ०१२०७ विशेष गाडी १५ रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०८ विशेष गाडी १९ रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.

नवी अमरावती - पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी क्रमांक ०१११९ विशेष नवी अमरावती येथून १३ आणि १६ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे न दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२० विशेष पंढरपूर येथून १४ आणि १७ रोजी १९.३० वाजता सुटेल आणि नवी अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता पोहोचेल.

खामगाव - पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी क्रमांक ०११२१ विशेष खामगाव १४ आणि १७ रोजी ११.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२२ विशेष पंढरपूर येथून १५ आणि १८ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि खामगाव येथे त्याच दिवशी १९.३० वाजता पोहोचेल.

लातूर - पंढरपूर (१० सेवा) गाडी क्रमांक ०११०१ स्पेशल लातूर येथून १२, १५, १६, १७, आणि १९ रोजी ०७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०२ विशेष पंढरपूर येथून १२, १५, १६, १७, आणि १९ रोजी १३.५० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी १९.२० वाजता पोहोचेल.

भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा) गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष भुसावळ येथून १६ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० अनारक्षित विशेष पंढरपूर येथून १७ रोजी २२.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल.

मिरज - पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा) गाडी क्रमांक ०११०७ मेमू . विशेष मिरज येथून १२ ते २१ जुलै दरम्यान ०५.०० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०८ मेमू विशेष पंढरपूर येथून १२ ते २१ दरम्यान ०९.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच न दिवशी १३.५० वाजता पोहोचेल.

मिरज - कुडूवाडी अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा) गाडी क्रमांक ०१२०९ मेमू विशेष मिरज येथून १२ ते २१ दरम्यान १५.१० वाजता सुटेल आणि कुर्दुवाडी येथे त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१० मेमू विशेष व कुडुवाडी येथून १२ ते २१ दरम्यान २१.२५ वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ०१.०० वाजता पोहोचेल.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण