बनावट कागदपत्रे सादर केल्यास प्रवेश रद्द होणार; विद्यार्थ्याविरुद्ध होणार कारवाई, CET कक्षाचा निर्णय प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

बनावट कागदपत्रे सादर केल्यास प्रवेश रद्द होणार; विद्यार्थ्याविरुद्ध होणार कारवाई, CET कक्षाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सध्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सध्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये तपासणी दरम्यान किंवा पडताळणीअंती सादर केलेली कागदपत्रे चुकीची, खोटी, बनावट किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश तत्काळ रद्द करण्याचा निर्णय कक्षाने घेतला आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध नियमांनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना अनाथ, संरक्षण दल, दिव्यांग, अल्पसंख्यांक या आरक्षणाचे लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून महाविद्यालयांमध्ये जागांचे वाटप करण्यात येत आहे.

कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता प्रवेश निश्चित केला आहे असे सिध्द झाल्यास अशा संस्थावर देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली