महाराष्ट्र

छ. शिवरायांची वाघनखे साताऱ्यात आणणार, वाघनखे केवळ तीन वर्षेच राहणार भारतात

शिवरायांच्या भीमपराक्रमाची साक्ष असणारी वाघनखे सातारकर आणि शिवप्रेमींना पाहता येणार आहेत.

नवशक्ती Web Desk

कराड : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे लंडनच्या म्युझियममध्ये आहेत. ती वाघनखे भारतात आणण्याची घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. येत्या दोन महिन्यात ती वाघनखे भारतात येणार आहेत. भारतात आणल्यानंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर शहरातील वस्तुसंग्रहालयात शिवप्रेमीना पाहण्यासाठी ती ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, साताऱ्यातील शिवप्रेमींना आणि सातारकरांना छत्रपती शिवरायांची वाघनखे पाहता यावीत, यासाठी ती साताऱ्यातही आणावीत, अशी मागणी साताऱ्यातील शिवप्रेमींनी मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली असून त्याला मंत्री मुनगंटीवार यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे शिवरायांच्या भीमपराक्रमाची साक्ष असणारी वाघनखे सातारकर आणि शिवप्रेमींना पाहता येणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे छ.शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करुन स्वराज्यावरील आक्रमण परतवून लावले होते. त्यावेळी छ.शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर केला होता. ती वाघनखे १८२४ मध्ये इंग्रजांनी लंडनला नेली. तब्बल १९९ वर्षांनी ती वाघनखे भारतात परत येणार आहेत. केवळ तीन वर्षे हा अनमोल ठेवा भारतात राहणार असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींना ही अनमोल वाघनखे पाहता यावीत म्हणुन मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथील वस्तुसंग्रहालयात ती ठेवण्याचा निर्णय मंत्री मुनगंटीवार यांनी जाहीर केला आहे. मात्र, साताऱ्यात ही वाघनखे येणार नसल्याने सातारकर आणि शिवप्रेमीमधून नाराजी व्यक्त होत होती. परंतु आता मंत्री मुनगंटीवार यांनी सहमती दर्शवली असल्याने सातारकर शिवप्रेमींना छ. शिवरायांची वाघनखे पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत