चंद्रशेखर बावनकुळे, संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी; तीन पक्षांतील तीन मंत्र्यांची समन्वय समिती

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून भाजपचे नेते, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या वतीने महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून निवड करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून भाजपचे नेते, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या वतीने महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नावाची घोषणा केली.

महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून ५१ टक्के मते घेऊन दोन-तृतीयांश बहुमताने महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकू. राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायती यामध्ये भाजप-महायुती ही प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

फडणवीस तसेच रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या जिल्हा प्रभारींची बैठक मंगळवारी मुंबईत झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राज्यातील विविध भागातील संघटन मंत्री, महामंत्री, मंत्रीमंडळातील मंत्री उपस्थित होते.

तब्बल तीन तास राज्यातील सर्व निवडणुकांचे विभागनिहाय सादरीकरण बैठकीत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रभाऱ्यांना जास्तीत जास्त महायुतीवर भर देण्याच्या, मित्रपक्षांवर टीका-टिप्पणी न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यानंतर रवींद्र चव्हाण यांनी बावनकुळे यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून घोषणा केली.

“महायुतीत समन्वय टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या समन्वयासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन मंत्र्यांची समिती असेल. यामध्ये एक भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असे तीन मंत्री समन्वयक म्हणून काम करणार आहेत. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये कुठेही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी भाजप घेईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

विमान तिकिटे महागणार! Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही इंधन अधिभार; वाचा सविस्तर

देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही; घाबरून इंधन साठवू नका, केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

पुण्यात धक्कादायक घटना; लिफ्टच्या दरवाज्यात अडकला चिमुकलीचा हात, CCTV व्हिडिओ व्हायरल